अज्ञात मुलीच्या ओळखीसाठी आवाहन

जालना/प्रतिनिधी,दि.6
छायाचित्रातील मुलगी श्रावणी (संस्थेत ओळखीसाठी ठेवलेले नाव) तीचे वय 1 महिना 5 दिवस असे आहे. पोलिस कॉन्स्टेबल/44 पोलिस स्टेशन परतुर येथे कार्यरत असून त्यांना फोनद्वारे मिळालेल्या माहितीनूसार रेल्वे स्टेशनच्या कंपाऊंडच्या बाहेर झुडूपांमध्ये निराधार अवस्थेत अज्ञात व्यक्तीने सोडलेली मुलगी आढळून आली. त्यांनी सदरील माहिती पोलिस निरीक्षक परतूर यांना माहिती दिली. परतूर पोलिसांनी श्रावणीला दि. 17 जुलै 2023 रोजी ताब्यात घेवून जालना येथील सरकारी दवाखाना येथे प्रथमोपचारासाठी दाखल केले, तर परतूर पोलिसांनी दि. 20 जुलै 2023 रोजी बालकल्याण समिती जालना यांच्यासमोर काळजी व संरक्षणाकरीता सादर केले. बालकल्याण समिती जालना यांच्या बदली आदेशान्वये श्रावणी बालकल्याण समिती औरंगाबाद यांच्या आदेशाने श्रावणी ही मुलगी दि. 25जुलै 2023 रोजी भारतीय समाज सेवा केंद्र औरंगाबाद येथे दाखल करण्यात आली आहे. या निवेदनाद्वारे श्रावणी हिच्या पालकांनी व नातेवाईकांनी निवेदन प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत लवकरात लवकर खालील पत्यावर संपर्क साधावा. अन्यथा त्यांना श्रावणी हिचा सांभाळ करणे शक्य नाही. असे समजून श्रावणी हिच्या कायमस्वरूपी पुर्नवसनाचा अन्य निर्णय संस्था बालकल्याण समिती औरंगाबाद यांच्या आदेशाने घेवू शकेल.
संपर्कासाठी पत्ता :-
भारतीय समाज सेवा केंद्र
अनिकेतन, प्लॉट नं.151, गुरुसहानीनगर,
एन-4, सिडको, औरंगाबाद.
फोन नं – 0240- 2953922
मा.अध्यक्ष
बाल कल्याण समिती
c/o निरीक्षण गृह, ताज हॉटेलच्या मागे
औरंगाबाद. 0240- 2381473
मा.पोलीस निरीक्षक
परतुर पोलीस स्टेशन,
ता.परतुर जि.जालना
02482- 221033