राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 6
राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे एक दिवशी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजय लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नशीब शेख, यश भैया संजय लहाने, पाखरू कुरेशी, रावसाहेब अंभोरे ,साबेर शेख ,रावसाहेब रोकडे, विजय पवार
प्रमुख पाहुणे म्हणून यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल जाफराबाद जिजाऊ इंग्लिश स्कूल वरुड जिजाऊ इंग्लिश स्कूल जवखेडा व राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल टेंभुर्णी या चारही शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले यामध्ये प्रामुख्याने शंभर मीटर धावणे तीन पायाची शर्यत कबड्डी खो-खो हॉलीबॉल रीले रेस आधी खेळांचा खेळानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय व सांघिक खेळात सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा बोराडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले



