साई संस्थेच्या दोन्ही शाळांचा इयत्ता दाहाविचा निकाल 100 टक्के
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.31
गेली 30 वर्षे कोल्हापूर,ठाणे,रायगड जिल्ह्यात शैक्षणीक क्षेत्रात अग्रेसर गणल्या जाणार्या साई संस्थेच्या रायगड जिल्ह्यांतील माणगाव तालुक्यांतील श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूलने आपली 28 वर्षाची पर्ंपरा कायम राखीत यंदा ही 2023-2024 सालच्या इयत्ता 10 विचा शालांत परिक्षेचा निकाल100 टक्के लावून गेली 28 वर्षाची 100 टक्के निकाल लावण्याची आपली परंपरा कायम राखली आहे, तर ठाणे जिल्ह्यांतील डोंबिवली मधील व्हिक्टोरिया एज्युकेयर या मराठी,इंग्रजी व गुजराथि माध्यमाच्या विद्यालयाने शैक्षणीक वर्ष 2023-2024 यावर्षीही इयत्ता 10 विचा शालांतपरिक्षेचा निकाल 100 टक्के लावला असून या विद्यालयाने गेली 16 वर्षाची आपली पर्ंपरा कायम रखल्याने या दोन्ही विद्यालयांतील विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होता आहे.तर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
साई संस्था डोंबिवली ही गेली अनेक वर्ष शैक्षणीक क्षैत्रात कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रिन्सीपॉल श्रीमती बिजाकक्षी राय (हेगडे) व त्यांचा शिक्षकवृंद त्याच प्रमाणे डोंबिवली मधील व्हिक्टोरिया एज्युकेयर या विद्यालयाचे विद्यालयाचे प्रिन्सीपॉल संदीप पिळ्ंकर व त्यांचा शिक्षकवृंद या सर्वांनी नियमित कठोर परिश्रम घेऊन या वर्षीही इयत्ता 10 विच्या शालांतपरिक्षेचा निकाल 100 टक्के लावून ही 100 टक्के निकालची पर्ंपरा कायम राखली आहे.
श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूल मधील कु.शंकर ढेपे 92.40 %, कु.आयशा बंदरकर-91.60 %, निधि जावीर 91.40% व मानस सुर्वे 91.00% यांनी आपली गुणवत्ता दाखवून विद्यालयात टॉपर म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, तर साई संस्था डोंबिवलीच्या व्हिक्टोरिया एज्युकेयर या विद्यालयातील विद्यार्थी सेजल हंसीका सोनार 86.60 % गुण मिळवून विद्यालयात प्रथम तर व्दितीय क्रमांकावर 85.60%गुण मिळवून कु.साक्षी सुनील शिंदे आणि तृतीय क्रमांकावर 84.60 %गुण मिळवून विश्वजित द्त्तात्रय सुपलेपाटील यांनी टॉपर म्हणून खिंड राखली आहे.या सर्वांचे साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील सर,सेक्रेटरी ब्रम्हानंद पाटील,संस्थेच्या खजिनदार पद्मिनीताई पाटील.विश्वस्त डॉ प्रणाली पाटील,सोनाली पाटील व मिलिंद ठाकुर व्हिक्टोरिया एज्युकेयर या विद्यालयाचे विद्यालयाचे सर या सर्वांनी त्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. साई संस्था ही शैक्षणीक क्षैत्रातिल अग्रगण्य संस्था असून या संस्थेचे कोल्हापूर येथे इ.बी.गडकरी मेडिकल कॉलेज,रायगड जिल्ह्यात माणगाव येथे शारदा इंग्लिश मिडियम स्कूल व उरण येथे नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल कार्यरत आहे.