जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काजळा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

जालना/प्रतिनिधी, दि.12
आज( दि.12) रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काजळा तालुका बदनापूर या शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री राहुल भाऊ तुपे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुलींनी राजमाता जिजाऊ यांची सुंदर वेशभूषा केली होती.श्री राहुल भाऊ तुपे यांच्या हस्ते दोन्हीही प्रतिमांचे पूजन करण्यात आले.यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री आर आर जोशी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिपक क्षीरसागर यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. रमेश गोल्डे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती सुनिता सानप व श्रीमती उषा शिंदे यांनी सहकार्य केले.कार्यक्रमास शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.