बरङशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.11
बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कमी कर्मचा-यावरही अधिकारी कर्मचारीवर्गाच्या एकाविचाराने काम करत कुटुंब शस्त्रक्रियेत उद्दिष्ट पार पाडत कार्यक्षेत्रात समाधान कारक काम करणाऱ्या बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत सोमवार अकरा मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सवीता निमडगे पळसेकर यांनी बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रासह कार्यक्षेत्रातील बरडशेवाळा कवाना पिंपरखेड मार्लेगाव अंबाळा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सहाय्यीका आरोग्य सेविका यांच्यासह कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणा-या महिला प्रसूती झालेल्या महिलांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान व मिठाई वाटप करीत जागतिक महिला दिन साजरा केला. यावेळी आयोजक सवीता निमडगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कौतुकास्पद काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारीवर्गाच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी. भि़से, डॉ. के. सी. बरगे , समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ ए. पी. आरेवार, डॉ ए. एम. बेरळक़र, डॉ व्ही. व्ही. कानोडे,आरोग्य सहाय्यक एस.जे. स्वामी, बि.डी. राठोड आरोग्य सहायिका एल. एम.वाघमारे, औषध निर्माण अधिकारी जी. यू. देशमुख सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे पळसेकर,रुग्ण कल्याण समिती सदस्या लता प्रभाकर दहिभाते आरोग्य सेविका श्रीमती एन. बी. ढोले, श्रीमती व्ही. वाय. मनवर श्रीमती व्ही. के. काळसरे श्रीमती एस. बी. टेकाळे, श्रीमती सी. एस. आङे श्रीमती एस. जी. जाधव श्रीमती एस. बी. जाधव, अधिपरिचारिका श्रीमती जे. के. पङघणे, आरोग्य सेवक व्ही. डी. बेलखेडे श्री शेख एजाज कनिष्ठ सहाय्यक श्री एस. एन. सूर्यवंशी, कार्यक्रम सहाय्यक श्री एस. बी. पांढरे, प्रयोगशाळातंत्रज्ञ श्री शेख अस्लम, परिचर श्री शेख इस्माईल श्री बी.बी. थाटे, यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक कुटुंब शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलासह नातेवाईक उपस्थित होते.