धुलीवंदनाच्या दिवशी अवैधरित्या देशी दारूची विक्री तीर्थपुरी पोलिसांच्या एका हॉटेल, किराणा दुकानासह चार ठिकाणी धाडी

विरेगाव / गणेश शिंदे,दि.16
तीर्थपुरी पोलिसांनी धुलीवंदनाच्या दिवशी एक हॉटेल, किराणा दुकानासह चार ठिकाणी धाडी टाकुन
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून 20 हजाराची देशी जप्त
धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थपुरी परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या हॉटेल, किराणा दुकानासह विविध ठिकाणी तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साजीद अहमद यांनी धाडी टाकून 5 जणांविरुद्ध कारवाई केली आहे.
राहिरा फाट्यावर असलेल्या सातबारा हॉटेलवर काल धाड टाकून पोलिसांनी 6 हजार 900 रुपये किंमतीची देशी दारू जप्त केली.
यावेळी या हॉटेलचे मालक बाबासाहेब नाईक, संभाजी शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुरमा ता. घनसावंगी येथील संदीपान मुकणे याच्या किराणा दुकानावर धाड टाकून पोलिसांनी 7 हजार 200 रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.
तसेच मुरमा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये देशी दारू विक्री करतांना विकास मुकणे यास पकडून त्याच्या ताब्यातून 3600 रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.
तीर्थपुरीच्या जुन्या बसस्थानकाजवळ पोलिसांनी धाड टाकून प्रदीप गाडेकर याच्या ताब्यातून 1500 रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.
सदर कामगिरी सपोनि. साजीद अहमद, पोलीस अंमलदार देशमुख, नारायण माळी, योगेश गायके, महेश तोटे आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.