आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि. 20
भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर व भारतीय योग संस्थान, शाखा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने योगेश्वरी कॉलनी व मुक्तेश्वर हॉल, जालना येथे योग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. 20 जून 2024 भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर व भारतीय योग संस्थान, शाखा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. 19 व 20 जून रोजी योगेश्वरी कॉलनी व मुक्तेश्वर हॉल, जालना येथे करण्यात आले होते. या प्रचार अभियानात 19 तारखेला सायंकाळी योगेश्वरी कॉलनी परिसरात योग दिंडी (रॅली) काढण्यात आली.
यावेळी योग साधकांनी घोषणा देत ‘योग’ चा प्रचार केला. दुसऱ्या दिवशी, 20 तारखेला सकाळी 6 वाजता उद्घाटन, योग मार्गदर्शन, योग प्रात्यक्षिक, स्वागत गीत, योग प्रश्नमंजुषा आदीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमात आरोग्य भारतीचे देवगिरी प्रांत व ऑर्थोपीडिक तज्ञ डॉ. प्रकाश शिबेदार, भारतीय योग संस्थानच्या राजश्री नाकडे, सुभाषचंद्र सिलारकर, डॉ संदीप चोपडे, डॉ. पूनम घुगे, उज्वला बारूरकर, शालिनी गावंडे, ओंकार बोरसे, आरोग्य भारतीचे संदीप ढाकणे व भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाषचंद्र सिलारकर यांनी केले. स्वागत गीत रेणुका सहस्त्रबुद्धे यांनी गायले, प्रदीप पवार व डॉ. प्रकाश शिबेदार यांनी मार्गदर्शन केले, तर आभार डॉ. पूनम घुगे यांनी मानले. भारतीय योग संस्थानच्या राजश्री नाकडे, सुभाषचंद्र सिलारकर, डॉ संदीप चोपडे, डॉ. पूनम घुगे, उज्वला बारूरकर, शालिनी गावंडे व ओंकार बोरसे यांनी साधकांकडून वेगवेगळे योग प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यक्रमात योगासंबंधी प्रश्न विचारून विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रिती पवार, शरद सादीगले व भारतीय योग संस्थान शाखा जालनाचे अधिकारी, पदाधिकारी व साधक यांनी विशेष परिश्रम घेतले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.