जागतिक आदिवासी दिन
जालना/प्रतिनिधी, दि.8
जागतिक आदिवासी दिन
माहीती संकलन
शाम गिराम
प्राचीन काळापासून इतर समाजापासून दूर असणारा आदिवासी समाज आता कुठेतरी आपल्या न्याय व हक्का साठी संघटित होताना दिसतो आहे
आदिवासी समाज म्हटले की सर्वाच्या डोळ्यासमोर चिञ उभे राहते. उघडा,अंगार ठिगळे असलेले कपडे घातलेला , चेहर्यावर कोणत्याही प्रकारचे तेज नसलेला पण आनंदी असलेला जंगलातील आदिवासी. आदिवासी समाज हा अतिशय दुर्गम, डोंगराळ व दर्या खोर्यात, वाडी ,पाड्यावर राहणार समाज होय. “वनवासी नही हम, आदिवासी है! इस देश के मूल निवासी है! ” असे नेहमीच म्हटले जाते पण या देशाचे मालक असुन सुद्धा आदिवासी समाजाची दयनीय अवस्था आहे. भारतावर अनेक आक्रमणे झाली अनेक बाहेरील सत्ता आल्या आणि गेल्या पण आदिवासी समाज माञ टिकून आहे. जंगलातील प्राणी, पशु,पक्षी, किडे, मुंग्या, झाडे, वेली, एवढेच नव्हे तर दगडाला सुद्धा नैसर्गिक शक्ती मानून मनोभावे पुंजन करणारा आदिवासी होय. निसर्गाची राखन करुन निसर्गाला खर्या अर्थाने सुजलाम सुफलाम् करणारा समाज म्हणजे आदिवासी होय. आदिवासी समाजतील कला ,साहित्या ,संस्कृती खुप महान आहे .एवढे असूनही सुद्धा आदिवासी समाजाची कुणीही दखल घेतलीच नाही. क्रांतिकारक बिरसा मुंडाने इंग्रज सत्तेविरुध उलगुलाण केले .त्याच्या बरोबर संघर्ष करुन इंग्रजाना सळो की पळो करुन सोडले .भारताच्या स्वंतञ्यात अनेक आदिवासी विरांनी बलिदान दिले .पण आमचा इतिहास कुणी लिहलाच नाही .राणी दुर्गावती ,झलकारी नारी ,असे कितीतरी देशभक्त होऊन गेले पण दखल माञ कुणाचीहि घेतली नाही .भारतात स्वंतत्र मिळून जवळपास 73 वर्षे झाले आहे. पण आदिवासी समाजाच विकास व्हावा तसा अजूनही झालेला नाही .महाराष्ट्र सरकारने आदिवासी मंञालयाच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय उभे केले .माञ पाहिजे तसा विकास झाला नाही.
भारतातील राज्यकर्ते व इतरही समाजानी आदिवासी समाजाकडे माणूस म्हणून बघितलेच नाही. त्यामुळे हा सामाज विकासापासुन कोसे दुर आहे. आदिवासी समाजाची स्थिती जेथे” जंगल, तेथे आदिवासी असे झाले आहे. हे सर्व सुरू असताना संयुक्त आंतरराष्ट्रीय संघटनांनी अर्थात (UNO) ने व तिच्या सलग्न आंतरराष्ट्रीय संघटना यानी सन 1993 हे वर्ष जागतिक आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले. तेव्हापासून 9 आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो.त्याचबरोबर सन 1994ते 2005 हे आदिवासी दशक म्हणून सुद्धा साजरे केले.आम्ही आदिवासी माञ जंगलाच्या बाहेर निघालोच नाही. आमच्यातील काही बांधव प्रगत समाजाच्या सानिध्यात येवून शिक्षण घेवुन सरकारी नोकरदार झाले पण त्यांनी सुद्धा स्व:ताच्या समाजाकडे साफ दुर्लक्ष केले. आमच्या समाजातील राजकीय नेत्यांनी तर कहरच केला. राजकारणात समाजाचे प्रतिनिधित्व करायचे सोडून स्वतःचेच घर मोठे केले. तिकडे आंतरराष्ट्रीय संघटना (UNO) आमची दखल घेतते .पण आमच्या समाजातील किवा इतर समाजाला व राजकीय नेत्यांना हे दिसले नाही. तब्बल 10 ते 15 वर्षानंतर सर्वसामान्य भोळ्या भाबड्या आदिवासी समाजाला समजले की 9 आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो.
सौ.अनिता नारायण माहोरे (शिक्षिका)
आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना.जिल्हा जालना.