26 डिसेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.23
हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे दि. 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या तंत्रप्रदर्शनामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील आयटीआय येथे शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण जॉब मॉडेलचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनामध्ये निवड झालेले जॉब मॉडेल पुढील विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाविषयी आस्था निर्माण व्हावी व त्यांच्या कौशल्यात वाढ व्हावी तसेच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करावे या तंत्रप्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. तरी या तंत्रप्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या प्राचार्या रजनी शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.