रवि भोईर यांची भाजपच्या उरण मंडळ अध्यक्ष पदी निवड झाल्याने विजय भोईर यांनी केला रवि भोईर यांचा सत्कार.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी जिल्हास्तरीय पदाधिकार्यांची घोषणा केली आहे.यामध्ये जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, कोषाध्यक्ष, विविध मोर्चांचे जिल्हाध्यक्ष, आघाड्यांचे जिल्हा संयोजक तसेच नऊ मंडलांचे अध्यक्ष यांचा समावेश आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.उरण तालुक्यातील भाजपचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते रवी भोईर यांची उरण मंडळ अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रवि भोईर हे गोरगरिबांना नेहमीच मदत करत असतात. पोलीस स्टेशन मध्ये कोणीही गरीब किंवा पीडित व्यक्ती असेल तर त्याला सहकार्य करतात. कार्यकर्त्यांना काम करण्याचे प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करतात. पदाधिकारी, कार्यकर्ता, जनतेसाठी चोवीस तास कार्यरत असणारा नेता म्हणून रवि भोईर यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत तसेच त्यांची निवड उरण मंडळ अध्यक्ष पदी झाल्याने जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी उरण मधील कार्यालयात त्यांची भेट घेउन शाल, श्रीफळ, संत तुकाराम महाराजांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला.तसेच प्रसार माध्यमाद्वारेही त्यांना शुभेच्छा दिल्या.