pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे मध्ये आजी-आजोबा दिवस मोठया उत्साहात साजरा.

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7

आत्माराम ठाकूर मिशन संचलित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे ता. उरण, जि. रायगड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आजी-आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्‌घाटन आजोबा महादेव गावंड यांनी केले. यावेळी कमळाकर गावंड, पार्वती गावंड, अहिल्या पाटील व गजानन म्हात्रे हे आजी-आजोबा उपस्थित होते. यावेळी विदयार्थ्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या, त्यामध्ये रचित पावस्कर, श्रीयाश पाटील व दिविशा गावंड यांना अनुक्रमे प्रथम, दुद्वितिय, तृतीय क्रमांक मिळाला तसेच आजी-आजोबा याच्या संगीत खुर्ची व बादलीत चेंडू टाकणे या स्पर्धा घेण्यात आल्या, संगीत खुर्ची महीलामध्ये जनाबाई म्हात्रे व काशी पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितिय क्रमांक पटकवला तसेच पुरूषांमध्ये शंकर पाटील व विश्वास म्हात्रे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकवला. तसेच बादलीत चेंडू टाकणे या स्पर्धेत महिलांमध्ये शुभांगी म्हात्रे व जनाबाई म्हात्रे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितिय क्रमांक पटकवला. तसेच पुरूषांमध्ये विलास ठाकूर व शंभु गावंड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितिय क्रमांक पटकवला. या कार्यक्रमामध्ये शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा शुभांगी पाटील व सदस्या मिनाक्षी पावसकर, रसिता म्हात्रे, प्रणाली पाटील, प्रदिप वर्तक, संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर, मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिल्पा भुसारी व स्वराली भोईर यांनी केले. तर आभार प्रर्दशन प्राजक्ता नाईक यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यास शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे