ब्रेकिंग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती दत्तनगर येथे उत्साहात साजरी

pub-7425537887339079
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती दत्तनगर, न्यू मोंढा रोड, जालना येथे अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद गणेश हिवाळे यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर बेघर झोपडपट्टी युनियनचे सचिव अभयकुमार यादव, जगन्नाथ गुंजाळकर, दशरथ सरकटे, प्रधान, ज्ञानेश्वर मानवतकर, विघाधर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. युवानेते सारांश यादव यांचा सत्कार हर्ष जाधव यांनी केला.
यावेळी बोलताना अभयकुमार यादव म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांना हक्क मिळावेत यासाठी संविधान दिले. मात्र, आज काही राजकीय नेते त्याचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. जर संविधानाचा योग्य अर्थाने आणि उद्देशाने वापर केला गेला, तर प्रत्येक नागरिकाला न्याय मिळू शकतो.” त्यांनी संविधानाच्या ७५ वर्षांच्या वाटचालीवरही भाष्य केले.
कार्यक्रमात महिलांनी, तरुणींनी आणि लहान मुलींनी बाबासाहेबांच्या कार्यावर आधारित कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास हिवाळे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश हिवाळे, गणेश हिवाळे, सचिन गवळी, हर्षदीप जाधव, विकास हिवाळे, अजय सरकटे, सोनु खरात, रवी दांडगे, आदींनी परिश्रम घेतले.