कै.गंगाबाई गंगाधरराव पिंलगुंडे यांची अठरावी पुण्यतिथी निमित्त ह.भ.प. वसुदेव महाराज कोंलबीकर यांच्या किर्तन,व संतांचा, दिव्यांग,वयोवृध्दाचा सत्कार महाप्रसादाने संपन्न

नांदेड/प्रतिनिधी,दि.12
नायगाव तालुक्यातील लालवंडी येथील दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र मराठवाडा प्रमुख मा.सुधाकरराव पिलगुंडे यांनी जिवंतपणी आई वडीलांची सेवा केली,
आजच्या युगात आई,वडीलाकडे पाहाण्याची त्यांची सेवा करण्याची प्रवृत्ती कमी होत असताना मा. पिलगुंडे सरांनी गेल्या अठरा वर्षापासुन आई ची पुण्यतिथी निमित्त किर्तन,भजन,दिव्यांचा,वयोवृध्दाचा सत्कार गावजेवन देऊन बिघडत चाललेल्या पिढीला आई, वडिलांची जिवंतपणी सेवा करावी व वर्षाला आई वडीलांच्या आठवणीनिमित्य सत्कार्य घडावे म्हणून गेल्या अठरा वर्षं अखंडपणे पावसाच्या दिवसात सुध्दा खंड न पडता भजन किर्तनाने सत्कार्य व्हावे या उद्देशाने दि.१२ जुलै २०२४ रोजी हभप वसूदेव महाराज यांच्या किर्तनाचे व दिव्यांचा,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,मुखेड ता.अध्यक्ष मगदुम शेख,अर्धापुर ता.अध्यक्ष दिंगाबर लोणे, बाबुराव पवार इत्यादी जेष्ठ नागरिकाचा सत्कार करण्यात आला.
या किर्तन भजन सोहळ्यात भजनी मंडळ,माजी जि.प.अध्यक्ष बाबुराव लंगडापुरे, पत्रकार विकास भुरे, सर्व गावकरी, ऊपस्थित होते.