pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावातील त्रुटी पुर्ततेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.16

जालना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत शैक्षणिक, सेवा व निवडणुकविषयक प्रकरणातील अर्जदारांची जात प्रमाणपत्र पडताळणी केली जाते. ज्या अर्जदारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना या समितीकडे जाती दावा पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत व ज्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाने त्रुटीची पूर्तता करण्यासाठी सुचना दिल्या आहेत, अशा प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करुन घेण्यासाठी दि. 18 ते 31 ऑक्टोंबर, 2023 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व संबंधित अर्जदारांनी 31 ऑक्टोबरपर्यंत समिती कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे