pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त 350 गावात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध

0 1 7 4 1 6

जालना/प्रतिनिधी,दि.7

महाराष्ट्र भुजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम-2009 चे कलम 20 नूसार जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत घोषित करुन नियमान्वये कलम 21 नूसार 500 मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याशिवाय स्त्रोत निर्माण करणे, उपसा करणे या बाबीला जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त एकुण 350 गावात प्रतिबंध करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम -2009 अन्वये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांची माहे सप्टेंबर अखेरचे पर्जन्यमान आणि सप्टेंबर महिन्यातील सरासरी पर्जन्यमान यांच्या तुलनेत झालेली घट आणि वाढ यांचा अभ्यास करुन तसेच ऑक्टोबर महिन्यातील निरीक्षण विहिरीच्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास करुन वरिष्‍ठ भूवैज्ञानिक यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत 138 गावे, जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत 59 गावे आणि एप्रिल ते जून 2024 या कालावधीत 153 गावे असा जालना जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला असून सर्व कालावधीत संभाव्य पाणी टंचाईग्रस्त अशी एकुण 350 गावे दर्शविण्यात आली आहेत. तरी या आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम-2009 मधील तरतुदीनूसार योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आदेशान्वये देण्यात आले आहेत. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

माहे जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत हाताळावयाची टंचाई भासणारी गावे खालीलप्रमाणे

अक्र तालुका
तालुक्यातील समाविष्ट गावांची संख्या
1 अंबड चिकनगाव देशगव्हाण माहेर भाईगाव आवा अंतरवाला आवा बदापूर
2 अंबड नागझरी साडेसावंगी मठ पिंपळगाव गोला बठान खु हरतखेडा कातखेडा
3 अंबड बारसवाडा डोमेगाव  कोळी सिरसगाव  शहापूर  भोकरवाडी जामखेड कानडगाव
4 अंबड लासूरा नागोबाचीवाडी  वाडी लासुरा बनटाकळी सुखापुरी झिरपी डावरगाव
5 अंबड कौडगाव लखमापूर पांगरी कुक्कडगाव रेवलगाव बेलगाव  
6 अंबड डोमलगाव टाका रामगव्हाण बु. वडीगोद्री  
7 घनसावंगी दैठणा बु. गाढेसावरगाव मुढेगाव
8 घनसावंगी पांगरा पांगरा तांडा      
9 घनसावंगी बोर रांजणी येवला यावल पिंप्री यावल पिंप्री तांडा पारडगाव
10 घनसावंगी चित्रवडगाव रांजणीवाडी कृष्णपूरवाडी रांजणी देवळी अंबड देवळी परतूर
11 घनसावंगी अंतरवाला बु.  जिरडगाव लमाणवाडी कंडारी परतूर
12 घनसावंगी गुणनाईक तांडा जांब समर्थ      
13 घनसावंगी नागोबाचीवाडी कुंभार पिंपळगाव मुर्ती लिंबी श्रीपत धामणगाव
14 जाफ्राबाद वरुड खु.          
15 जाफ्राबाद तोंडोली          
16 जालना लोंढ्याचीवाडी खनेपुरी मजरेवाडी भाटेपुरी सालगाव जालना
17 जालना हातवन वाडीवाडी पाचनवडगाव रोहनवाडी मालेगाव खु माळशेंद्रा
18 जालना भातखेडा खरपुडी कचरेवाडी हडप रामनगर  बापकळ
19 जालना हिस्वन बु. हिस्वन खु  
20 जालना गवळी पोखरी नंदापूर थार
21 परतूर बाबई डोल्हारा एकरुखा कोरेगाव नागापूर मापेगाव खु.
22 परतूर सिंगोना शेलवाडा वलखेड
23 परतूर सातोना खु सातोना बु. उस्मानपूर  खांडवी सिरसगाव चिंचोली
माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 पर्यंत हाताळावयाची टंचाई भासणारी गावे खालीलप्रमाणे
24 बदनापूर देवगाव कस्तुर वाडी कडेगाव कुसळी रोशनगाव  
25 बदनापूर तळणी लोधेवाडी डावरगाव        
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे