द्रोणागिरी स्पोर्टस, उरण कर आणि कोमसाप कवीनी साजरा केला उरणला मैदान मिळविल्याचा विजय – राजेश पाटील

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
१९ मे रोजी द्रोणागिरी स्पोर्टस उरणने उरणकरांच्या मैदानासाठी बेधडक आक्रोश आंदोलन छेडले होते.उरणकरांच्या अत्यंत गरजेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा नेते म्हणवून घेणाऱ्या राजकीय नेत्यांनी ५४ वर्षे न उचलल्याने द्रोणागिरी स्पोर्टसने उचललेला होता .तो प्रश्न आव्हानास्पद होऊन कौतुकाचा आणि औत्सुक्याचा बनला होता.आता सिडको प्रशासनाने उरण साठी मैदान देण्याचे कबूल केले आहे. त्यासाठी सर्वांनी अथक मेहनत घेतली आहे. हा विजय सर्वांचा आहे.असे मत प्रतिष्ठित नागरिक राजेश पाटील यांनी जागरण कार्यक्रम वेळी सांगितले.
द्रोणागिरी स्पोर्टसने कोकण मराठी साहित्य परिषद उरण यांना लढ्यात उतरण्याचे आवाहन केल्यानंतर रायगड भूषण प्रा एल बी पाटील यांनी ते आवाहन स्वीकारून तालुक्यातील १७ गावांना कवितांचा जागर केला.या जागरात मच्छिंद्र म्हात्रे, अजय शिवकर,अनील भोईर,संजीव पाटील, रामचंद्र म्हात्रे,भरत पाटील, संजय होळकर, रमण पंडित, किशोर पाटील,हेमंत पाटील,अनंत पाटील, रंजना केणी,अक्षता गोसावी,दर्शना माळी, अनामिका राम, अनुज शिवकर,तेजस्विनी गायकवाड, शिवप्रताप पंडित, हरिश्चंद्र माळी.डा.संजीवन म्हात्रे,मढवी चंद्रकांत,भालचंद्र म्हात्रे,जयवंत लहू पाटील,हरेश पाटील,
अरुण म्हात्रे,मिनल माळी, भगवान म्हात्रे, रमाकांत ना. म्हात्रे,लवेंद्र मोकल,किरण घरत इ.नी सहभाग घेतला होता.
१९९८ साली खोपट्याच्या सात गावाला नळाचे पाणी मिळावे म्हणून प्रा.व्यंकटेश म्हात्रे,बी एन डाकी,के.पा.गुरुजी, मोरेश्वर शाहीर,धनंजय पाटील यांच्या सहकार्याने ८ दिवस कवितांचा जागर माझ्या नेतृत्वाखाली झाला.विवेक साहेबांनी मोर्चा काढून १ कोटी ४० लाखांची त्या आठ गावांना पाणी योजना आणली.तो आहे खरा यशस्वी जागर !
असाच जागर २००५ मध्ये मा. आमदार विवेक पाटीलसाहेब
यांच्या विचारात समरस होऊन सेझच्या विरोधात २३ गावांना २३ रात्री केला होता.सेझला विवेक साहेबांनी पळविले पण त्यातही कवींचा मोठा वाटा आहे हे विवेक साहेबांनी जाहीरपणे मांडले होते.असे मत जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील यांनी व्यक्त केले.
उरणात आज लेडीजबार नाही.शक्यतो भविष्यातही उरणकर होऊ देणार नाही. १९९८ मध्ये ३१ डिसेंबरला लेडिजबार उद्घाटन होणार होते. ते उद्घाटन कवी रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी मा.नगराध्यक्ष नूरशेठ मुल्ला,मा.नगराध्यक्ष नगराजशेठ,जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामनाथ गायकवाड, गोपिनाथ चव्हाण ,दिलीप म्हात्रे,टि.आर.भोईर,नाना पाटील ,गोपाळ पाटील ,दौलत घरत इत्यादींच्या पाठिंब्यावर बंद केले, उरणकरांच्या नैतिकतेचा तो विजय कवितेतूनच झाला
उरणला कवींच्या कवितांच्या
जागराची परंपरा आहे.आजचा विजय उरणकरांच्या, द्रोणागिरी स्पोर्टसच्या इच्छाशक्तीचा जसा
आहे तसाच तो एलबींच्या नेतृत्वाखालील कोमसाप कवींचा
सिडको विरोधात उरणला मैदान मिळविण्याचा विजय आहे.अशीही अधिक माहिती राजेश पाटील यांनी उरण येथे जागरण कार्यक्रम प्रसंगी दिली आहे.