ब्रेकिंग
श्रावणी किरण केणी हिचे क्रीडा स्पर्धेत सुयश

0
3
1
5
3
2
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.27
मुंबई येथे अथलेटिक्स स्पोर्ट्स फॉउंडेशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय ट्रॅक नाईट्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांची कन्या श्रावणी केणी हिने धावण्याच्या स्पर्धेत ८०० मीटर मध्ये ब्राँझ पदक तर सांघिक रिले मध्ये गोल्ड मेडल पटकाविले आहे. तसेच श्रावणी हिने उलवे येथे झालेल्या राज्यस्तरीय नमो चषक स्पर्धे मध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सिल्वर मेडल पटकाविले आहे.श्रावणी किरण केणी हिने केलेल्या क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीमुळे तीचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वच स्तरातून तिच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0
3
1
5
3
2