जालना येथील बालाजी गल्ली रोडवरील जालना शहर महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांच्या निवासस्थानी डॉ. सलोनी संजय पंच हिने जुन्या संस्कृतीला जीवंत ठेवण्यासाठी रामायणाचा शाडुच्या मातीचा हुबेहुब देखावा करून, श्रीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. सदरील देखाव्यामध्ये रावण, केवट, सिता हरण, राम- हनुमान भेट, राम सेतु, संजीवनी कोटी, अशोक वाटीका, कुंभकर्ण, हनुमान भक्ती, शबरी कथा, शिव- पुजन यांचा समावेश आहे.