pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला बुलढाणा अर्बन कडून मोठी मदत.

वारसाला पावणे तीन लाखाची मदत सपुर्द. बुलडाणा अर्बनच्या विमा योजनेतून भेटला लाभ.

0 3 8 4 4 1

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.1

टेंभुर्णी येथील तरुण शेतकरी सुरेश रुस्तुम डहाके यांचा दिनांक २३ एप्रिल रोजी त्यांचा स्वतःच्या मोटार सायकल हून प्रवास करता वेळी फोर व्हिलर गाडी ने अपघात होऊन त्याचे विचार दरम्यान मृत्यू झाला होता.
त्यांच्या नावाचे टेंभुर्णी येथील बुलडाणा अर्बन मध्ये फिक्स डिपॉझिट दोन लाख त्र्यायतर हजार रुपयाचे फिक्स डिपॉझिट होते.त्यांच्या मृत्यू चे दिनांक आणि फिक्स डिपॉझिट ची तारीख या मधील अंतर मिळून भेटलेले व्याज आणि या फिक्स डिपॉझिट सह त्यांना तब्बल दोन लाख सत्तातर चारशे चोवसष्ट रुपयाचे इतके लाभाचे धनादेश त्यांचा वारसाला त्यांचा परिवार सदस्य सह आज बुलडाणा अर्बन शाखा टेंभुर्णी येथे देण्यात आला.
ज्या व्यक्तीचे या बँकेत फिक्स डिपॉझिट(एफ डी ) असते त्यांचे जर अपघात मध्ये मृत्य झाला तर त्यांना त्यांचे बाँड चे जितके पैसे तितकेच पैसे देण्याची ही चांगली योजना असून या योजनेमुळे सामान्य खातेदाराचे वारसाला मोठा आधार होऊन त्याचा सुख दुःखाच्या सतत बुलडाणा अर्बन असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. या वेळी धनादेश देता वेळी विभागीय अधिकारी नितीन परदेशी ज्येष्ठ संचालक देवीदास देशमुख अलकेश सोमाणी, प्रदीप काबरा, गजानन उगले, डॉ अविनाश सुरुशे, डॉ प्रशांत काबरा, राजू शिंदे, शाखा अधिकारी पंढरीनाथ मिसाळ विशाल डहाके यांची उपस्थिती होती.मयत सुरेश डहाके यांच्या पत्नी श्रीमती कुशीवर्ता बाई डहाके यांना हा धनादेश देण्यात आला. त्यांनी बुलडाणा अर्बन चे विशेष करून धन्यवाद मानत आभार व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे