pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

तालुकास्तरीय”राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धेत कु.विद्या मोंढे हीचा द्वितीय क्रमांक!

विद्या मोंढे ही प्रतिभा माध्यमिक विद्यालय, काजळा वर्ग 10 ची विद्यार्थ्यांनी.

0 1 1 8 1 4

 काजळा/प्रतिनिधी, दि.15

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपालिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्याथ्यांसाठी “राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धा २०२३” आयोजित करण्यात आल्या होत्या.या संस्थेने शाहू महाराजांच्या कार्यांची सर्वांना ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवणाची उन्नती करावी, यासाठी सारथी संस्थेमार्फत शालेय व माध्यमिक स्तरावरील विद्याथ्यांसाठी “राजर्षी शाहू महाराज तालुका स्तरीय व महानगरपालिकास्तरीय निबंध स्पर्धा २०२३” आयोजित करण्यात येत आहे. ही निबंध स्पर्धा पुढील ५ वर्ष चालू ठेवण्याचा सारथी संस्थेचा मानस आहे.

सारथी संस्थे मार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सदर निबंध स्पर्धा आयोजित केली जाते प्राथमिक स्थर इ.३ री ते ५ वी, उच्च प्राथमिक स्तर  इ. ६ वी ते ७ वी व माध्यमिक स्तर इ. ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी सदरची स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व तालुका व महानगरपालिका स्तरावर घेण्यात आल्या होत्या. यामध्ये  तालुकास्तरिय “राजर्षी शाहू महाराज निबंध स्पर्धेत  प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा या शाळेची विद्यार्थ्यांनी कु.विद्या बाळासाहेब मोंढे वर्ग 10 वा या विषयावर विद्या मोंढे हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

निबंधाचा विषय होता  “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य” या यशाबद्दल विद्या मोंढे हिचे संस्थेचे सचिव श्री मा.सुदामभाऊ शिंदे, गटशिक्षणाधिकारी श्री क्षीरसागर,केंद्रप्रमुख श्री खिल्लारे, गावचे मुख्याध्यापक श्री  सूर्यकांत गुजर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

 

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 4