विविध कृषी पुरस्कारासाठी अर्ज करावेत
मागील वर्षाचे जिल्ह्यातील 6 शेतकऱ्यांना पुरस्कार वितरीत

जालना/प्रतिनिधी,दि. 7
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वर्ष- 2023 करीता कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थांनी विविध कृषी पुरस्कारासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे बुधवार दि.30 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कृषी विभागाकडून वर्ष 2020, 2021 आणि 2022 वर्षासाठी जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त एकुण 6 शेतकऱ्यांना राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया मुंबई येथे स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. यामध्ये वर्ष 2020 चा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार बाजी उम्रद येथील श्रीकृष्ण नामदेव डोंगरे, उद्यान पंडित पुरस्कार रामेश्वर भगवान उबाळे, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार कर्जत येथील पांडूरंग निवृत्ती डोंगरे यांना देण्यात आला. वर्ष 2021 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार ठोलेवाडी येथील उदलसिंग सुखलाल चुंगडे यांना तसेच वर्ष 2022 चा वसंतराव नाईक जिजामाता कृषी भुवन पुरस्कार खेडगाव येथील श्रीमती सुचिता दत्तात्रय शिनगारे, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार भरडखेडा येथील रामदास शेषेराव बारगजे यांना देण्यात आला आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.