pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिव्यांग तपासणी व यु आय डि कार्ड यांच्या अडीअडचणी संदर्भात सिव्हिल सर्जन यांनी कर्मचारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत आढावा बैठक संपन्न

0 1 7 7 3 7

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटील,दि.4

नांदेड येथे गुरू गोविंदसिंग हॉस्पिटल नांदेड येथे जिल्हा शल्यचिकित्सक मा. भोसीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील नांदेड, नायगाव,भोकर, हदगाव,देगलुर, मुखेड गोकुंदा किनवट,या तपासणी बोर्डाच्या कर्मचारी व दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील,दिव्यांग प्रहार संघटना, अध्यक्ष विठ्ठलराव मंगनाळे,दिव्यांग कर्मचारी, अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.शेवाळे इ. पदाधिकारी यांच्या सोबत शिष्टमंडळाची बैठकीत दिव्यांगाच्या ऑनलाईन तपासणी मध्ये आर्थीक व्यवहार करून दिव्यांगाना बोगस प्रमाणपत्र दिले जात आहे.खऱ्या दिव्यांगाना टक्केवारी मिळत नसल्याचे, नांदेड जिल्ह्यात बोगस दिव्यांग कर्मचारी असुन त्यांची फेरतपासणी करून बोगस कर्मचारी यांच्या वर कार्यवाही करावि अशा अनेक विषयांवर संघटनेच्या पदाधिकारी यांनी आपले मत मांडले.
मा जिल्हाशल्यचिकित्सक भोसीकर यांनी कर्मचाऱ्यांना सक्त सुचेना केल्या कि खऱ्या दिव्यांगाना नियमानुसार टक्केवारी द्या गैरनियमाने टक्केवारी दिल्यास योग्य ते कार्यवाही करण्याचे बैठकीत संकेत दिले.
या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व बोर्डाचे कर्मचारी,दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी विठ्ठलराव मंगनाळे, सुधाकर शेवाळे, चंपतराव डाकोरे, ज्ञानेश्वर नवले,दिंगाबर लोणे,मारोती मंगरूळे,साईनाथ बोइनवाड इत्यादी कार्यकर्त्ये उपस्थित होते,

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे