
जालना/प्रतिनिधी, दि 17
आजोबा मिस्तरी काम करत. त्यांच्या इच्छेनुसार वडील अभियंता झाले. मी अधिकारी व्हावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. ती साकारण्यासाठी जिद्दीने अभ्यास केला. एमबीबीएसला मिळालेला प्रवेश सोडून पुणे, नंतर ‘जेएनयू’ला गेले. आज यूपीएससीत ६७५ वी रैंक मिळाली’, असे जालना येथील नम्रता दामोदर घोरपडे आत्मविश्वासाने सांगत होती.
नम्रताचे वडील जालना जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये अभियंता आहेत. मूळ गाव बायगाव बुद्रुक (ता. देऊळगावराजा). वडिलांच्या नोकरीमुळे आजवर वडिलांचा सहवास कमी लाभला. आई संजीवनी यांनी नम्रतासह बहीण, भाऊ अशा तिघांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली होती. नम्रताचा भाऊ पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो तर बहीण छत्रपती संभाजीनगरमध्ये एम. ई. चे शिक्षण घेत आहे. नम्रताचा एमबीबीएसला नं लागला होता. परंतु, वडिलांचे स्वप्न खुणावत होते. त्यानुसार तिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर ‘जेएना विद्यापीठात राज्यशास्त्रातून पदव्युत्तर पदवी घेतली. नंतर नेटही उत्तीर्ण झाली एम. फिल. ही पूर्ण केले. सध्या ती ‘ अॅण्ड गव्हर्नन्स’ या विषयावर पीएचडी करत आहे. सोबत यूपीएससी तयारीही सुरू होती. तिसऱ्या प्रयत्नात तिने यूपीएससीत बाजी मारली. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको कार्यालयात मुख्य प्रशासक शशिकांत देवखेड यांची ती नात आहे.