pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लाल बावटा युनियनच्या प्रयत्नाने उरण मधील बांधकाम कामगारांना भांडी वाटप

0 4 0 8 5 2
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13

उरण तालुक्यातील बांधकाम काम करणाऱ्या कामगारांना लाल बावटा बांधकाम कामगार संघटना रायगड यांच्या प्रयत्नाने रायगड जिल्हा बांधकाम कामगार मंडळ तर्फे गृहोपयोगी भांडी वाटप कार्यक्रम चारफाटा उरण येथे आयोजित करण्यात आले .गेली वर्षांपासून पाठपुरावा करून सर्व कागदपत्र जमा करून त्या कामगारांना बांधकाम मंडळात नोंदीत करण्यात आले .बिगारी, मिस्त्री, गंवडी,सुतार, रंग कामगार, वायरमन व नाका कामगार असे असंख्य कामगार नोंदीत नाहीत त्यांना नोंदीत केल्यावर या दिवाळीत ५००० बोनस, १ ली ते पदवीधर मुलांना २५०० रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक भत्ता, वैद्यकीय अपघातग्रस्त मयत कामगारांना रुपये ५ लाख मदत, अपंगत्व आल्यास १ लाख रूपये मदत, मातृत्व वेळी व लग्नासाठी मदत असे अनेक लाभ व सुरक्षा किट या कामगारांना मिळणार आहेत.कामगारांचे नाव नोंदीत करण्यासाठी लाल बावटा बांधकाम कामगार रायगड अध्यक्ष काॅ. जयवंत तांडेल यांनी अथक मेहनत घेतली.आई इन्फ्रास्ट्रक्चरचे नरसु पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. कामगार नेते काॅ.भूषण पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे