यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या ‘महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्रातर्फे’डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
अंबड/प्रतिनिधी, दि.15
यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्सच्या अंबड येथील महाराष्ट्र कौशल विकास केंद्रातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्यानिमित्त महाराष्ट्र कौशल विकास केंद्राचे केंद्र प्रमुख जगन्नाथ हल्ल्याळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भागवत साबळे यांनी त्यांच्या मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाची प्रेरणादायी कहाणी सांगितली. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात जगन्नाथ हल्याळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या अभिवादन कार्यक्रमाला संस्थेतील सर्व प्रशिक्षक, विद्यार्थी व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक काळे यांनी व आभार प्रदर्शन बबन गायके यांनी केले