श्री विठ्ठल रूक्मिणी हनुमान व हनुमान मंदिर कुंचोली ता. नायगाव येथे अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटील,दि.23
नायगाव तालुक्यातील कुंचोली येथे अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अनेक कार्यक्रमांचे आयोजन दि.२७ जानेवारी २०२५ ते दि.०३ फेब्रुवारी २०२५ रोजी काल्याच्या किर्तनाने सांगता होईल. नंतर महाप्रसाद होईल.
सप्तहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज पहाटे ४ ते सहा श्रीची पुजा काकडा आरती सकाळी ७ ते १०.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी १०.३० ते १२ गाथा भजन दूपारी ४ ते ५ प्रवचन सायं.५ ते ६ हरीपाठ रात्री ८ ते १० हरी किर्तनाचा रात्री १० नंतर हरी जागर होईल
ज्ञानेश्वरी व्यासपिठ:– शिवाजीराव पा.इंगळे खानापूर, ज्ञानेश्वर पा शिंपाळे, चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर,
गाथा प्रमुख:– बाबुराव पाटिल टाकळी,
हरिपाठ प्रमुख:–गंगाजी पा.भोसले खतगाव,
काकडा प्रमुख:–हनमंत महाराज तळेगाव
मृदगाचार्य:–विश्वेश्वर महाराज कोंलबिकर, तुकाराम जाधव मोकासदरा
गायनाचार्य:–बाबुराव पाटिल टाकळी,गंगाजी पा.भोसले खतगाव, रमेश पाटिल, साईनाथ पाटील खैरगाव, बाबुराव पाटिल राजुने खतगाव समस्त भजनीं मंडळ कुंचोली
किर्तनकार पुढीलप्रमाणे
दि.२७ जानेवारी २०२५ हभप त्र्यंबक महाराज नांदगावकर
२८ जानेवारी २०२५ हभप.विष्णुदास महाराज तांदळीकर
२९ जानेवारी २०२५ हभप.दिंगाबर महाराज गडगेकर
३० जानेवारी २०२५ हभप.हनमंत महाराज किनीकर
३१ जानेवारी २०२५ हभप.दता महाराज वळसंगवाडीकर
०१ फेब्रुवारी २०२५ हभप.ज्ञानेश्वर महाराज बरबडेकर
२ फेब्रुवारी २०२५ हमप.वासुदेव महाराज कोंलबिकर
२ फेब्रुवारी २०२५ हभप.किसन महाराज बरबडेकर यांचे काल्याचे किर्तन नंतर महाप्रसाद होईल
तरी कुंचोली परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या आनंदोत्सवात सहभागी होऊन भक्तीत सहभागी व्हावे असे आव्हान श्री विठ्ठल रूक्मिणी जागृत हनुमान मंदिर समिती कुंचोली गावकऱ्यांच्या वतीने प्रसिध्दी दिली