pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उंचेगाव ( बु .) येथील आरोग्य शिबीरात ९५२ रुग्णांची तपासणी व औषधी वाटप

0 1 7 4 0 8

निवघा बाजार/दिगंबर शिंदे,दि.25

अमृत महोत्सवी वर्ष , मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि सार्वजनिक गणेशोत्सव निमीत्ताने हदगाव तालुक्यातील उंचेगाव ( बु .) येथील ग्रामपंचायत च्या वतीने २४ सप्टेंबर रविवार रोजी मोफत महाआरोग्य शिबीर आणि दिव्यांगाना साहीत्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला . या शिबीरात नांदेड चे नामवंत डॉक्टर यांनी उपस्थीती लावली होती . सर्व रोग निदान शिबिरात हृदय रोग , नेत्र रोग ‘ मानसोपचार , मदुमेह , स्त्री रोग अदी आजाराचे निदान करुन मोफत औषधाची वाटप करण्यात आले , सदर शिबिरात ९५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली तर याच कार्यक्रमात दिव्यांगाना साहीत्य वाटप करण्यात आले . परीसरातील तळणी , भाटेगाव , उमरी , वाकी , आमगव्हाण , इरापुर , शिऊर , गौळ , वाकोडी , शेंबाळपिंप्री , निवळा , जगापुर , भांभरखेडा अदी गावातील नागरीकांनी शिबीरात सहभाग नोंदवला होता , आरोग्य शिबिर यशस्वी ते साठी उंचेगाव ग्रामस्थांनी परीश्रम घेतले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे