स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी अवलंब करावयाची कार्यपध्दती
जालना/प्रतिनिधी,दि.7
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक – 2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये शक्तीचा वापर करुन निवडणूकीचे कालावधीत जालना जिल्हयात परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांची निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या/वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100मीटर परिसरात तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याळ कार्यालयाचे अवारात फक्ति उमेदवार, सूचक/अनूमोदक अथवा दोन व्यरक्तीस यांना परवानगी दिली जाईल. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये अंमलात राहतील. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तरल यांनी जारी केले आहेत.



