काजळा फाटा ते सायगाव या रस्त्याच्या कामासाठी ज्ञानेश्वर बोबडे यांचे आमरण उपोषण

जालना/प्रतिनिधी, दि.15
बदनापूर तालुक्यातील काजळा फाटा ते सायगाव या रस्त्याचे मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत रस्त्याचे काम चार महीण्यापुर्वी चालु झाले व 15 दिवस काम चालले नंतर हे काम का बंद पडले? सदर रोडची अंदाजे रक्कम 8 ते 9 कोटी आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांना व सार्वजनिक बांधकाम विभाग, जालना यांना सुध्दा पत्र व्यवहार केला आहे. त्यांनी काही एक उत्तर दिलेले नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून ते आज दि. 15/08/2024 रोजी सकाळी 09.00 वाजल्यापासून मा. जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या कार्यालय समोर अमरण उपोषणास बसले आहे असे त्यांनी सांगितले.
पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे बदनापुर यांनी त्यांचा अमरण उपोषणा पासून परावृत्त करुन मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हे काम जोपर्यंत चालु होत नाही तो पर्यंत ते अमरण उपोषणाचा निर्णय मागे घेणार नाही असे त्यांनी live न्युज महाराष्ट्र च्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.