pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामनाथ गायकवाड यांचे दुःखद निधन.

0 3 1 1 3 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

भारताच्या स्वातंत्र्य लढयात स्वातंत्र्य सैनिकांना महत्वाचे स्थान होते. ते आजही आहे. देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणा-यांना जनता , देश कधीच विसरत नाही. देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्यांपैकी एक जेष्ठ स्वांत्र्यसैनिक म्हणून सुपरिचित असलेले उरणमधील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड (वय ९२ वर्षे ) यांचे मंगळवार दि २/७/२०२४ रोजी वृध्दापकाळाने त्यांच्या घरी कोटनाका येथे दुःखद निधन झाले.

देशभक्त रामनाथ गायकवाड यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढयात महत्वाचे योगदान राहिले आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य युध्दात सहभाग घेतला. १९५१ च्या गोवा मुक्ती संग्राम मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक हिरवे गुरुजी यांच्या सानिध्यात त्यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीला सळो की पळो करून सोडले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी कारावासही भोगला. उरणमधील हुतात्मा स्मारकांसाठी त्यांनी मोठा लढा दिला.लायन्स क्लबचे ते माजी अध्यक्षही होते. गोर गरिबांना, उपेक्षितांना सामाजिक बांधिलकीतून सढळ हाताने दान करण्यास, त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास ते नेहमी पूढे असायचे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक असलेले रामनाथ सखाराम गायकवाड यांच्या निधनाने संपूर्ण रायगड जिल्हयात, मुंबई, नवी मुंबई परिसरात शोककळा पसर‌ली आहे. ३ मूले, १ मूलगी, १२ नातवंडे ,१६ पतवंडे असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. रामनाथ गायकवाड यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावरही दु:खाचे डोंगर कोसळले आहे. स्व. रामनाथ गायकवाड यांच्या अंत्यविधीला स्वातंत्र्यसैनिक, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमदार महेश बालदी, तहसिलदार उध्दव कदम, नायब तहसिलदार नरेश पेढवी, नायब तहसिलदार सानप, उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी पूष्पगुच्छ अर्पण करून शासकीय मानवंदना देउन शासनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. स्व रामनाथ गायकवाड यांचा दशक्रिया विधी गुरुवार दि ११/७/२०२४ रोजी सकाळी ८ वा. श्री क्षेत्र माणकेश्वर उरण येथे तर उत्तर कार्य विधी रविवार दि १४/७/२०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी आनंदी हॉटेलच्या बाजूला,प्रवीण इंजिनिअर वर्क,कोटनाका येथे होणार आहे. सदर प्रसंगी कोणीही कोणत्याही प्रकारचे दु:खवटे आणू नये. कोणत्याही प्रकारचे दु:खवटे स्विकारले जाणार नाहीत अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 1 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
21:50