pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी अशोक घोरबांडला निलंबित करून अटक करा.

जितेंद्र गाडेकर,(जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते) यांचे आवाहन.

0 4 0 8 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि 18

माणसाचा जगण्याचा अधिकार कुणालाच हिरावून घेता येत नाही. न्यायिक प्रक्रिया पुर्ण करूनच कोर्टाला शिक्षा करण्याचा अधिकार आहे. पोलीसांना नाही ! परभणी येथील आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतलाय. शहीद रोहित वेमुला याची आज आठवण येते. तो ही ओबीसी होता. सोमनाथ हा ही ओबीसी समाजातील आहे.
लॉ चां विद्यार्थी असणारा हा तरुण “न्यायालयीन कोठडीत” असताना मरण पावतो, ही मानवी हक्कांची पोलिसांनी केलेली पायमल्ली आहे.
सोमनाथला पोलीस कस्टडीमध्ये असतांना पुढे न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यापूर्वी मेडिकल केले जाते. नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात येत असते. ही कोर्ट प्रक्रिया आहे. तो न्यायालयीन कोठडीत गेला, तेव्हा तो शारिरिक दृष्ट्या सक्षम होता का? त्याचा पोलीस कोठडी रिमांड कोणी घेतला? जमानत झाली असतानाही त्याला का सोडले नाही? हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केले. याचा अर्थ मयत सोमनाथ सुर्यवंशी यांचा परभणी जिल्हा कारागृहात मृत्यू झाला. सोमनाथ चा मृत्यु संविधानातील नागरिकाच्या मूलभूत हक्काची हत्या आहे! अतिरेकी अजमल कसाब वर ८४ कोटी खर्च करुन फाशी देण्यात आली होती. अतिरेक्याला बिर्याणी खाऊ घालायची आणि देश भक्त, संविधान प्रेमी नागरिकाला रीमांडमध्ये ठार करायचे ? ही निचं मनूवादी प्रवृत्ती आहे. शहीद सोमनाथ हा संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला होता. त्याचा मृत्यू ही शहादत आहे. !

पो. नि. अशोक घोरबांड हा आमच्यासाठी respected P l नाहीं. तो संविधानवादी जनतेचा गुन्हेगार आहे ! पोलिस निरीक्षक घोरबंड याच्या कुटुंबांची जातीय पार्श्वभूमी तपासात घ्यावी, या  विकृत प्रवृत्तीच्या माणसाने बौद्ध तरुणावर पूर्वग्रह व सुडाच्या भावनेने मारहाण करून गुन्हे दाखल केले. अनेक तरुणांना पाठलाग करून, मध्यरात्री कोंबिंग् करुन अटक केली आणि पीसीआर घेतले. सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करावा.#परभणी संविधान विटंबना # पोलिस काँबिंग #शहीद सोमनाथ सुर्यवंशी # सरकारी नोकरी, जनतेच्या करांच्या पैशातून सरकारी पगार होतें कायद्यापुढे सर्वसमान PM CM आत गेले, हा तर जनतेचा नोकरआहे . 58 वर्षे सेवा करणारा. #घोरबंड निच्च माणसाचा वर्दीचा माज उतरालाच पाहिजे #त्याचे निलंबन करुन अटक झालीच पाहिजे. याच्या आज पर्यंत च्या कायदेशीर पगारीची आणि स्थावर, जंगम, ठेवी, नगदी, बॉण्डस, ई.प्रॉपर्टी ची चौकशी झाली पाहिजे. जुगार, मटका, गुटखा, रेती, रांडा, चे हप्ते घेणारा हा इसम आहे. वर्दितला जातीवादी व्यक्ती आहे.याच्यावर कठोर कार्यवाही झाली पाहिजे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे