
0
3
9
5
2
1
जालना/प्रतिनिधी,दि.17
जालना येथे येत्या 20 सप्टेंबर शुक्रवारपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन उत्पादन वाढीसाठी नेमक्या कोणत्या तंत्राचा वापर केला पाहीजे हा या महोत्सव आयोजना मागील उद्देश असल्याची माहीती कृषी महोत्सवाचे मुख्य संयोजक आ.कैलास गोरंट्याल यांनी दिली. शहरातील फ्रेजर बॉईज हायस्कुलच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या कृषी महोत्सवाचे उदघाटन दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्याहस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजयी वडेट्टीवार हे राहणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खा. डॉ. कल्याण काळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पा.दानवे यांची या महोत्सवास विशेष उपस्थिती राहणार आहे. माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. बबनराव लोणीकर, आ. राजेश राठोड, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी म.रा.कापसे, महीको सिडसचे रितेश मिश्रा, कलश सिडसचे समीर अग्रवाल, कृषी तज्ञ विजयअण्णा बोराडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, या तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परिसंवाद, चर्चासत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून परिसंवाद व चर्चासत्रांच्या माध्यमातून शेतकर्यांना तंज्ञाचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यात शुक्रवार दि. 20 सप्टेंबर रोजी म्हणजेच पहील्या दिवशी सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 21 सप्टेबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत सेंद्रीय शेती , नैसर्गिक शेती या विषयावर खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ञ डॉ. राहुल चौधरी हे उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12 ते 1 या वेळेत सोयाबीन, तुर लागवड तंत्रज्ञान या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विस्तार विद्यावेता डॉ. सुर्यकांत पवार हे मार्गदर्शन करणार असून सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन, गायन, नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. 22 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत कृषी अन्न प्रक्रिया उद्योग व विक्री व्यवस्थापन या विषयावर जालना जिजामाता कृषीभुषण पुरस्कार प्राप्त उद्योजिका सौ.सिताबाई मोहीते या मार्गदर्शन करणार असून दुपारी 12 ते 1 या वेळेत सिताफळ लागवड तंत्रज्ञान या विषयावर जाफराबाद तालुक्यातील नळविहीरा येथील अॅग्रो व्हिजन गट शेती संघाचे अध्यक्ष संजय मोरे हे मार्गदर्शन करणार असून सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. 23 सप्टेबर सोमवारी दुपारी 3 ते 4 या वेळेत मोसंबी तंत्रज्ञान या विषयावर बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्रातील डॉ. संजय पाटील सोयगावकर हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 4 ते 5 या वेळेत महिला सक्षमीकरण या विषयावर सौ. योगिताताई खांडेभराड या महिलांना मार्गदर्शन करणार आहेत तर सायंकाळी 5 ते 9 या वेळेत महाराष्ट्राची लोककला या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जालन्यासह मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी या तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन कृषी महोत्सवाचे मुख्य संयोजक आ. कैलास गोरंट्याल यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
0
3
9
5
2
1



