5 दिवसीय पशुसंवर्धनावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.7
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून जालना येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, गाय, म्हैसपालन प्रशिक्षणाचे दि.20 ते 24 जुन 2024 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी प्रवेश अर्ज महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन विभागीय अधिकारी डी.यु.थावरे यांनी केले आहे.
पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, गाय, म्हैसपालन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी किमान सातवी पास व 18 ते 50 वयोगटातील असावा तसेच स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छा असावी. सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वत: चा स्वयंरोजगार निर्माण करावा हा सदर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक दीपक सेठी मो.9637555325 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.