pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

0 1 7 4 1 4

पुणे/प्रतिनिधी,दि. 1 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आमदार सुनील कांबळे, पुणे जिल्हा मातंग संघाचे अध्यक्ष भीमराव साठे, सहदेव ढवरे आदी उपस्थित होते. पुणे जिल्हा मातंग समाज व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती समितीच्यावतीने आयोजित लोकशाहीरांच्या दुर्मिळ चित्र प्रदर्शनास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भेट दिली. जिल्हा मातंग संघाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथेही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे