तळणी येथे स्वच्छता ही सेवा कार्यक्रम संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि. 26
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या माय भारत आणि संत भगवान बाबा युवा मंडळाच्या वतीने तळणी येथील विश्वनाथ विद्यालयात स्वच्छता ही सेवा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शिक्षक आर. बी. ढवळे, ए. के. पांचाळ, जी. ए. देशमुख, जी. एस. मापारी, एस. जी. जाधव, ए. एस. फुपाटे, वाय. डी. मापारी, यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक एस. पी. लोढे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्वच्छतेची शपथ घेतली. स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी पटवून दिले. शपथवाचनानंतर विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने परिसरातील कचरा गोळा केला आणि स्वच्छता राखण्याचे वचन दिले. या उपक्रमाद्वारे शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. संत भगवान बाबा युवा मंडळाचे अध्यक्ष वैभव कांगणे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता ही फक्त शाळा किंवा घरापुरती मर्यादित नसून समाजाच्या विकासासाठी देखील आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे नियम पाळण्याचे आणि समाजात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छ परिसर टिकविण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. लोढे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेच्या शपथवाचनाने झाली. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.