प्रामाणिक पणे काम करणारे भरत मढवी यांचे जेएनपीटी मध्ये सिनियर मॅनेजर पदावर प्रमोशन
कर्तुत्वाने छाप उमटवली म्हणून उरण तालुक्यात सर्वत्र कौतुक

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
उरण तालुक्यातील जसखार गावातील अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला आलेले भरत मढवी यांचे वडील रामदास मढवी हे दुसऱ्यांच्या शेतावर आणि आगरांवर मजूर म्हणून काम करत असत. अश्या हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढून देखील शिक्षणाची आस त्यांनी सोडली नाही. शिक्षणाची आवड आणि मार्गदर्शन त्यांना त्यांचे मोठ भाऊ प्राचार्य एच आर मढवी यांनी केले. लहान पणापासून अभ्यासात हुशार असलेले भरत मढवी यांनी दहावीच्या परीक्षेत 150/150 गुण मिळवून एक आगळाच विक्रम केला होता. परंतु परिस्थितीमुळे नोकरी करून शिक्षण करत राहिले. 1989 साली जे एन पी टी साठी झालेल्या भरती परीक्षेमध्ये त्यांनी पहिला क्रमांक मिळवून नोकरीत रुजू झाले. आपल्या प्रामाणिक कार्य शैलीमुळे त्यांचा परिचय सर्व कामगार आणि अधिकारी यांना होता. त्यांनी चेअरमन ऑफिस, पोर्ट प्लानिंग, फायनान्स, मार्केटिंग, ट्रैफिक आणी एच आर अश्या अनेक विभागांमध्ये काम केले. त्या विभागातील विभाग प्रमुख यांनी त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक केले. तसेच अनेक चेअरमन यांनी देखील त्यांच्या कामाची पोच पावती विविध अवॉर्ड देवून केली. आज त्यांची सीनिअर मॅनेजर पदी नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. हे साध्य करत असताना हे नमूद करणे आवश्यक आहे की त्यांची दोन्ही मुले डिग्री इंजिनियर असून चांगल्या पदावर कार्यरत आहेत. ह्या यशामध्ये त्यांच्या सुविद्या पत्नी श्रीमती विशाखा यांचा मोठा वाटा आहे. मोठे भाऊ प्राचार्य एच आर मढवी आणि वहिनी श्रीमती पुष्पलता मढवी यांनी त्यांना लहानाचे मोठे करताना जे कष्ट घेतले ते कधीही विसरता येणार नाही व ह्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांचे आहे असे भरत मढवी यांनी सांगितले. एक सामान्य घरातील व्यक्ती शिक्षणाच्या आणि प्रामाणिकपने काम केल्याच्या जोरावर किती यशस्वी होवू शकतो हे त्याचे जिते जागते उदाहरण आहे. भरत मढवी यांचे जे एन पी टी चे ट्रस्टी दिनेश पाटील, रवी पाटील आणी भूषण पाटील तसेच सुधाकर पाटील अध्यक्ष उरण सामाजिक संस्था, संतोष पवार सामाजिक कार्यकर्ते, दिनेश घरत अध्यक्ष प्रकल्पग्रस्त शैक्षणिक संस्था, आर पी क्लब जसखार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.