pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने पोलीस अधिक्षक कार्यालयात कार्यशाळा संपन्न

0 1 7 4 0 9

जालना/प्रतिनिधी,दि.29

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समितीसमोर काम करणारे पोलीस अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचे अधिकारी, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बाल कल्याण समितीचे सदस्य व विधीज्ञ यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा पोलीस अधिक्षक कार्यालय, जालना येथे संपन्न झाली.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रणिता पी. भारसाकडे वाघ, 3रे सह दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी डॉ. व्ही. जी. कारमोरे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रधान न्यायाधीश बाल न्याय मंडळ श्रीमती एन. ए. वानखडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, तसेच अॅड. संजय सेंगर आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगुन तसेच मंचावर उपस्थित सर्वांची ओळख करून कार्यक्रमाची सुरूवात केली. बाल न्यायमंडळासमोर व बाल कल्याण समितीसमोर काम करणा-या सर्व घटकांनी (कार्यालयांनी) एकमेकांच्या समन्वयाने काम केल्यास बालकांच्या हक्क संरक्षणाचे काम जास्त चांगल्या प्रकारे करणे शक्य होईल असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर डॉ. व्ही. जी. कारमोरे, 3रे सह दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी, जालना यांनी उपस्थित विशेष पोलीस दल बाल न्याय मंडळ यांना बाल न्याय (काळी व संरक्षण) कायदा विषयी सोप्या शब्दात मार्गदर्शन केले. तसेच विविध क्लिष्ट नियम उपस्थितांना समजावुन सांगितले. त्यानंतर श्रीमती वानखेडे यांनी बाल न्याय मंडळाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांनी त्यांच्या मनातील प्रश्नांचे निरसन करुन घेतले. ॲङ संजय सेगर यांनी बाल कल्याण समितीस कामकाजासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संत्रसंचालन लोकअभिरक्षक कार्यालयाचे ॲड. यश लोसरवार यांनी केले आभार ॲङ मौजूद शेख यांनी मानले, असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे