pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे रंगणार ‘कपट्यम’ हे नाटक

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे मंगळवार २८ नोव्हेबर २०२३ ते ०४ जानेवारी २०२४ दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ५८० संघाचा सहभाग असून ठाणे, पालघर, रायगड जिल्हयातील संघही या स्पर्धेत सहभागी आहेत. रायगड जिल्हयातून उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळ प्रस्तूत, फ्रेंड्स सामाजिक कलामंच भेंडखळ आयोजित मराठी दोन अंकी रहस्यमय नाटक ‘कपट्यम’ चा देखील समावेश आहे. बुधवार दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता हे दोन अंकी कपट्यम नाटक सादर होणार आहे. मराठी दोन अंकी रहस्यमय ‘कपट्यम’ या नाटकाचे लेखक किरण अनंत घरत असून दिग्दर्शक चंद्रविलास घरत यांनी केले आहे. नेपथ्य दत्ता भोईर, प्रकाश योजना कौशिक भोईर, संगीत अक्षय भोईर, रंगभूषा, वेशभुषा अमृत म्हात्रे, वृत्तनिवेदन दर्शना माळी, तसेच सूत्रधार जन्मेंजय भोईर हे असतील. सदर नाटकात रेखा ठाकूर, निकिता पाटील, संकेत ठाकूर,राजेश ठाकूर, भावेश ठाकूर, कौशिक म्हात्रे, उमंग भोईर, चंद्रविलास घरत आणि किरण घरत आदी कलाकार आपली भूमिका या नाटकात सादर करणार आहेत. सदर नाटक पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे