pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नांदेड जिल्हाअधिकारी नांदेड यांनी आंदोलनाची दखल घेऊन संबंधित अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत बैठकीत पंधरा दिवसांत प्रश्न सोडविण्याचे दिले लेखि आदेश

पंधरा दिवसांत अश्वासनाचा अंमलबजावणी नाहि झाल्यास 24डिसे.2023 ला आंदोलनाचा बैठकीत चंपतराव डाकोरे ने दिला ईशारा

0 1 7 4 1 5

नांदेड/प्रतिनिधी,दि.4

दिव्यांगासाठि शासन प्रशासन 3 डिसे. जागतिक दिनी अनेक दिव्यांगाच्या सवलती जाहिर करून त्यांचा गौरव केला जातो.
पण शासन,प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आज दि.2 डिसे.2023 पासुनअनेक प्रश्नासाठि संघर्ष करून दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावे म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली
दिव्यांगाना हक्क द्या नसेल तर मरण्याची परवानगी मिळेप्रर्य़त
बेमुध्दत धरने आंदोलन जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर चारशे दिव्यांगानी 3 डिसे. जागतिक दिनी आंदोलन करण्याची वेळ शासन प्रशासनाने आणल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.अनेक संघटनेनी आंदोलनास पाठिंबा देऊन संताप व्यक्त केला.
दिव्यांगाच्या धरने आंदोलनाची तिसऱ्या दिवसी जिल्हाअधिकारी नांदेड यांनी दखल घेऊन संबंधित अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत बैठकीत पंधरा प्रश्नावर सविस्तर एक तास चर्चा करण्यात आली ते सर्व पंधरा प्रश्न पंधरा दिवसांत सोडविण्याचे लेखि आदेश दिले जर पंधरा दिवसांत अश्वासनाचा अंमलबजावणी नाहि झाल्यास 24डिसे.2023 पर्य़त न सुटल्यास आंदोलनाचा ईशारा बैठकीत चंपतराव डाकोरे ने दिला.
ज्या दिव्यांगाना दिसत नाही,ऐकु येत नाहि,बोलता येत नाहि,चालता येत नाहि अशा दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठि जिल्हाअधिकारी नांदेड यांना
पंचविस महिण्यात ४3 निवेदन, सहा वेळा मोर्चे, ४ वेळा धरने आंदोलन अनेक वेळा चर्चा करून मुध्दत देऊन न्याय हक्क मिळत नसल्यामुळे लोकशाहि दिनात न्याय मिळेल म्हणुन निवेदन देऊन पंचविस महिने दिव्यांगाना न्याय व साधे ऊतर देता येत नसेल तर लोकशाहि दिन कशासाठि?दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारि अभियानात लाखो रूपये खर्च करून दिव्यांगाना काय न्याय मिळेल?व दिव्यांगाना हक्क मिळत नसेल तर दिव्यांग दिनात घोषणेचा वर्षाव कशासाठि ? मा.जिल्हाअधिकारी नांदेड यांनी आपल्या कक्षात दहा महिन्यांत पाच वेळा दिव्यांग संघटनेच्या व ,संबंधित अधिकाऱ्या सोबत बैठक घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाचा कालावधी दिला.
दिव्यांग,वृध्द,निराधार बांधवांना आपल्या हक्कासाठी दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाक़ोरे पाटिल
कायदेतज्ज्ञ म.अध्यक्ष ऑड धोंडीबा पवार,सुधाकर पिलगुंडे, ज्ञानेश्वर नवले,राजाभाऊ शेरकुरवार,नामदेव बोडके, प्रेमसिंग चव्हाण, उमेश भगत,विठ्ठल माने,मगदुम शेख,चादराव चव्हाण,मानसिंग वडजे,बालाजी जाधव,धनगरे,,विठ्ठल बेलकर,बाबु पवार,मारोती बोईनवाड, उचांदु गवाले,पांडुरंग धनगरे, बालाजी चौतमाल,गणेश भास्करे,बाबु फुलारी,अरविंद राठोड,इत्यादी शेकडो बांधव उपस्थित होते असे प्रसिध्दी पत्रकात दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे