एस.एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
उरण तालुक्यातील माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या एस.एस.पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन प्रचंड उत्साहात व नावीन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला.दरवर्षी शाळेचे संस्थापक शंकरशेठ शिवराम पाटील यांच्या स्मरणार्थ वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यात येतो. प्रथमतः त्यांना नमन करून शिक्षकनेते बाळाराम पाटील , शाळेच्या सल्लागार स्वाती म्हात्रे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावर्षीच्या वार्षिक स्नेह संमेलनाची रचना ‘स्वप्न’ या संकल्पनेवर आधारित होती. पूर्वप्राथमिक विभागातून सुरु झालेला स्वप्नमय संगीत नृत्याचा कार्यक्रम पुढे प्राथमिक व माध्यमिक विभागातील मुलांनी त्यात रंग भरून एक सुंदर स्वप्नाची संध्या प्रेषक पालक वर्गापुढे सादर करून त्यांना आनंदित केले. शाळेची सजावट “स्वप्न’ या संकल्पनेला साजेशी केली होती. पालकांनी गुलाबी रंगाचे वेश परिधान करून कार्यक्रमास उत्कृष्ट होण्यास सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ७ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांनी केले.विद्यार्थ्यांनी नृत्याबरोबर नाटक, त्यानंतर स्वतः बँडपथक तयार करून गाणे गायले. कार्यक्रमाला लाभलेल्या पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व त्यातून शाळा, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.अशा या उत्कृष्ट दर्जाच्या एका विशिष्ट ‘स्वप्न’ रचनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचे नियोजन करणाऱ्या शाळेच्या मुखाध्यापिका मृदुला धोडी मॅडम यांनी मनापासून सर्व पाहुणे, पालकवर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांना धन्यवाद देऊन व कौतुक करून कार्यक्रमाची सांगता केली. व असेच यशस्वी कार्यक्रम आम्ही सादर करू असा विश्वास दिला.