pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिव्यांग व्यक्तींनी फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज सादर करावेत

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी,दि.27

हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान  योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल दि. 3 डिसेंबर 2023 रोजी  तयार करण्यात आले आहे. तरी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविणेसाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. 4 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक १०.०६.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांच्या स्तरावरुन सुरु आहे. योजनेचा उद्देश –  दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे,  दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.  सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे असा आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे