जालना लोकसभा मतदार संघातील मतमोजणीनिमित्ताने वाहतुकीच्या मार्गात बदल
जालना/प्रतिनिधी,दि.3
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक- 2024 च्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदार संघ-18 मतदार संघाची मतमोजणी दि. 4 जुन 2024 रोजी मे. सरस्वती ऑटो कम्पोनंटस प्रा.लि. प्लॉट नं.बी-8/1 जालना फेज -3 एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीयल एरीया जालना येथे पार पडणार आहे. ही मतमोजणी सकाळी 7 वाजेपासून फेरीनिहाय मतमोजणी संपेपर्यंत चालणार असुन निकाल ऐकण्यासाठी जनतेची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने वाहतुकीच्या नियमनासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये या मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, असे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी जारी केले आहेत.
नागपुर ते मुंबई समृध्दी महामार्गावरील जालना समृध्दी टोल नाका येथुन बाहेर पडणारी आणि जालना तसेच छत्रपती संभाजीकडे जाणारी वाहतुक ही मतमोजणी ठिकाणाच्या पुर्व बाजुकडील महादेव मंदीर खांदगांव रोड विनोद रॉय इजिनियरिंग प्रा.लि. कंपनी शिवनेरी हॉटेल (ढाबा) मार्गे जालना व छत्रपती संभाजीनगरकडे जाईल. छत्रपती संभाजीनगर कडुन बदनापुर मार्गे येणारी व समृध्दी महामार्गाकडे जाणारी वाहतुक ही शिवनेरी हॉटेल (ढाबा)- विनोद रॉय इजिनियरिंग प्रा.लि. कंपनी. खांदगांव रोड महादेव मंदीर मार्गे समृध्दी महामार्गाकडे जाईल. जालनाकडुन येणारी व समृध्दी महामार्गाकडे जाणारी वाहतुक ही शिवनेरी हॉटेल (ढाबा) विनोद रॉय इजिनियरिंग प्रा.लि. कंपनी- खांदगांव रोड महादेव मंदीर मार्गे समृध्दी महामार्गाकडे जाईल. हे आदेश दि. 1 जुन 2024 रोजी सकाळी 5 वाजेपासून मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.