ओबीसी एससी एसटी आरक्षण वाचवण्यासाठी परीस्थीतीनुसार एकजुटीची गरज ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके
हदगांव शहरात सकल ओबीसी एससी एसटी समाज बांधवाचा मेळावा संपन्न

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.9
बुधवार नऊ आक्टोंबर रोजी हदगांव हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी एसटी एससी समाज बांधवाकडुन ओबीसी समाज योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचे तामसा येथून रॅलीने ठिक ठिकाणी हदगांव शहरात जंगी स्वागत करीत हदगांव शहरांतील राष्ट्रीय क्लब मैदानावर कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषासह शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त अभीवादन करुन करण्यात आली. निळु पाटील कोळगावकर यांनी प्रास्ताविकात हदगांव हिमायतनगर तालुक्यातील घराणेशाहीसह विविध विषयाचा पाडा मांडला.
यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके सह नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित समाज बांधवाना मार्गदर्शन करताना कवाना ता.हदगांव व नांदेड शहरात दत्तात्रय अनंतवार कवानकर व अतुल पाईकराव यांनी ओबीसी समाज बांधवाच्या आरक्षणासह विविध विषयासाठी केलेल्या उपोषणाकडे जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतीनीधीने केलेल्या दुर्लक्षाची खंत व्यक्त करीत आरक्षण विषयी तालुक्यातील आजी माजी लोकप्रतीनीधीची भूमिकेविषयी खरडून समाचार घेत ओबीसी एसटी एससी समाज बांधवाचे आरक्षण वाचवण्यासाठी येणा-या निवडणूकीत आपल्या हक्काचे विचार मांडण्यासाठी लोकप्रतीनी असणे आवश्यक असल्याचे सांगून घराणेशाही मोडून काढण्याचे आवाहन केले.
यावेळी आयोजन समितीसह हदगांव हिमायतनगर तालुक्यातील सकल ओबीसी एससी एससी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.