pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठवाड्याचे आराध्य दैवत मत्स्योदरी देवीची सुरक्षा राम भरोसे

व्यवस्थापक कैलास शिंदेचा हलगर्जीपणा व मनमानी कारभारावर कारवाई होणार का?

0 1 7 4 1 4

अंबड/अनिल भालेकर,दि.23

संपूर्ण मराठवाड्याचे आराध्य दैवत श्री मत्स्योदरी माता लाखो भक्तजनांचे श्रद्धास्थान आहे. जागृत व नवसाला पावणारी माता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात. नवरात्रीच्या काळामध्ये तर भक्तांचा महापूरच या ठिकाणी पहावयास मिळतो. मत्स्योदरी मातेने भक्तजनांची इच्छापूर्ती झाल्याबद्दल व मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून दान स्वरूपात अमूल्य वस्तू व आर्थिक देणगी देतात.बारा महिने हा क्रम सातत्याने सुरू असतो.परंतु अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असणारे तसेच करोडोचे उत्पन्न असणाऱ्या मंदिराची सुरक्षा रामभरोसे आहे.आणि याचाच फायदा घेत चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेटीतील सुमारे पाच लाख रुपयावर डल्ला मारण्यास यशस्वी झाले.
चोरी झाली तेव्हा दुरुस्ती अभावी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे निर्लज्जपणे सांगितले जाते.मग प्रश्न असा उपस्थित होतो की करोडेची आर्थिक उलाढाल असताना सीसीटीव्ही कॅमेरे वेळीच दुरुस्त का करून घेतले नाही? व्यवस्थापक कैलास शिंदे यांचा हा हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा म्हणावा लागेल. विशेष म्हणजे मंदिराच्या अगदी बाजूलाच पुजारी राहतात. व्यवस्थापक कैलास शिंदे व पुजारी यांना फक्त आर्थिक मलिदा खाण्यापुरतेच ठेवले आहे का? मंदिर सुरक्षितेबाबत त्यांची जबाबदारी व कर्तव्यदक्ष असणे गरजेचे नाही का? असा रोष जनतेतून व्यक्त केला जात आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांनी मत्स्योदरी मंदिराचा जिर्णोद्धार केला असून होळकर रियासत मधून सुमारे साडेचारशे एकर जमीन या मंदिराच्या देखभालसाठी इनाम स्वरूपात दिली आहे.आजहि या जमिनीच्या लिलावातून मंदिर प्रशासनाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यात भाविक भक्ताकडून मिळालेले रोख रुपयाची देणगी व मौल्यवान वस्तू,दागिने.त्यातभर म्हणजे शासनाकडून मिळणारा लाखो रुपयाचा निधी,याची एकूण गोळा बेरीज केली तर डोळे दीपवणाऱ्या करोडो रुपयाचा आकडा समोर येतो. मग प्रश्न असा उपस्थित होतो की इतक्या मोठ्या प्रमाणात करोडोचे आर्थिक उत्पन्न असताना मंदिर सुरक्षेतेबाबत हलगर्जीपणा का? करोडो रुपयाचा पैसा जातो कुठे? व्यवस्थापक कैलास शिंदे व पुजारी यांच्या हलगर्जीपणा बाबत गंभीर दखल घेत मंदिर समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार कारवाई करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निश्चितच उपस्थित होत आहे.
या संपूर्ण गंभीर प्रकरणावर सर्वांचे आर्थिक हित लक्षात घेऊन बेजबाबदार व हलगर्जीपणा करणाऱ्या व्यवस्थापक कैलास शिंदे व पुजाऱ्यांवर तहसीलदार चंद्रकांत शेळके कारवाई न करण्यातच धन्यता मानतील, कारण “आपण सगळे भाऊ भाऊ, मलिदा आपण मिळून खाऊ! हे तत्व लागू झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
मात्र आराध्य दैवत मातेचा दरबारच सुरक्षित नाही याची खंत भक्तजनांना वेदनादायी ठरत आहे हे मात्र तितकेच सत्य आणि यामुळेच बेजबाबदार, हलगर्जीपणा करणाऱ्या,मुजोर व्यवस्थापक कैलास शिंदे वर कारवाई करण्याची मागणी जनतेतून व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे