अंबड तालुका क्रीडा संकुलच्या कामकाज बाबत जिल्हा क्रीडा अधिकारी उदासीन
अजून किती वर्ष आम्हाला खेळण्यापासून वंचित ठेवता? विद्यार्थ्यांची आर्त हाक..!

अंबड/प्रतिनिधी, दि.17
गेल्या अनेक महिन्यापासून अंबड तालुका क्रीडा संकुलनाच्या कामकाजामध्ये प्रामाणिक व निस्वार्थपणे खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न असतो.अंबड शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना तसेच शहरातील हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार, तंत्रशुद्ध,आणि योग्य मार्गदर्शनानुसार क्रीडा प्रकारातील ज्ञान मिळणे हा त्यामागचा उद्देश आहे.
परंतु गेल्या अनेक महिन्यापासून अंबड तालुका क्रीडा संकुलनाचे कामकाज अत्यंत कासव गतीने सुरू असल्याचे दिसून येते. तालुका क्रीडा अधिकारी पद सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यासागर यांच्याकडे डेपो टेशन वर आहे. अंबड शहरासाठी अत्यंत गरजेचे असणारे अंबड तालुका क्रीडा संकुलनाच्या उभारणीसाठी आपण पूर्ण वेळ या ठिकाणी जबाबदारी सांभाळणे गरजेचे आहे.परंतु तसे होत नसल्याचे दिसून येत आहे. अंबड या मुख्यालय ठिकाणी राहून आपण आपली जबाबदारी पार पडणे नियमानुसार आवश्यक ठरते.
पत्रकार म्हणून मी याबाबत माझी रोखठोक भूमिका मांडून जाब विचारू शकतो. विद्यार्थ्यांना होणाऱ्या असुविदेबाबत व त्यांच्या हक्कापासून दूर ठेवण्याबरोबरच कर्तव्यात कसूर बाबत माझी लेखणी सडेतोड जाब विचारेल. आणि पत्रकार म्हणून ते माझे कर्तव्य बनते..!
“मरगळ झटकून… अंबड तालुका क्रीडा संकुलनाच्या कामकाजाबाबत कार्यतत्परता दाखवावी ही अपेक्षा..