सण, उत्सवात ध्वनीची मर्यादा राखून सूट दिल्याचे आदेश जारी
जालना/प्रतिनिधी,दि.12
जिल्ह्यात सन 2025 मध्ये विविध धार्मिक सण, उत्सव व उपक्रम संपन्न होणार असून या सण,उत्सावाच्या काळात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर शासन निर्णय व ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) नियम 200 च्या नियम 5 (3) नूसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर श्रोतेगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागेशिवाय इतर ठिकाणी ध्वनीची विहीत मर्यादा राखून चालु वर्षातील खालील सण / उत्सव व उपक्रमाच्या दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.
सण, उत्सव व उपक्रमामध्ये शिवजयंती, ईद-ए-मिलाद, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी (दि. 15.08.2025) अनुक्रमे एक दिवस तर गणपती उत्सवासाठी दि. 27 ऑगस्ट व 5 सप्टेंबर रोजीचे 2 दिवस तसेच नवरात्री उत्सवातील नवमी आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन, ख्रिसमस, 31 डिसेंबर रोजी, विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा दि.14 व 15 फेब्रुवारी रोजी आणि महत्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव दोन दिवस अशी सुट जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सण, उत्सवासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतची सुट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका, नगर पंचायत, स्थानिक संस्था व ध्वनी प्रदुषण प्राधिकरणाची राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.