pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कल्याणी शिवारात एक एक्कर क्षेत्रावर गांजाची शेती पारध पोलिसांची मोठी कारवाई कोट्यवधी रुपयांची गांजाची झाडे जप्त खाजगी मजुरांच्या मदतीने गांजाची झाडे उपटण्याचे काम सुरू

0 1 7 4 1 4

विरेगाव/गणेश शिंदे, दि.22

पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांनी आज धाडसी कारवाई करत भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारातील एक एकर क्षेत्रावरील गांजाची शेती उध्वस्त करून कोट्यवधी रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत.

कठोरा बाजार येथील एका इसमाने कल्याणी शिवारात एक एक्कर शेतामध्ये गांजाची झाडे लावून शेती केली असल्याची माहिती सपोनि. गुसिंगे यांना मिळाली होती.
आज त्यांनी मोठ्या फौजफाट्यासह नायब तहसीलदार पप्पूलवाड, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेत या शेतावर धाड टाकली.
यावेळी पोलीस, तहसील आणि कृषी विभागाचे पथक ही एवढी मोठी गांजाची शेती पाहून अवाक झाले.
पोलिसांनी खाजगी मजूर लावून अक्षरशः या शेतातील गांजाच्या झाडांची मोजणी करून, ते उपटून घेतले.
त्यानंतर एका ट्रॅक्टरमधून बंदोबस्तात ही गांजा झाडे पारध पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहेत.
ही एकूण झाडे अंदाजे साडेपाचशे पेक्षा जास्त असून, एका ओल्या झाडाचे वजन पाच ते साडेपाच किलो आहे.
पारध पोलीस ठाण्याचे सपोनि. चैनसिंग गुसिंगे, पोलीस उपनिरीक्षक विलास गुसींगे, पोलीस उपनिरीक्षक विजय आहेर, नायब तहसीलदार पप्पुलवाड, तलाठी सोनूने, पोहेकाँ. सिनकर , सरडे, खिल्लारे, गणेश पायघन, शिवाजी जाधव, नितेश खरात, संतोष जाधव, शरद शिंदे, महिला पोकाँ. कविता बारवाल, रुपाली नरवाडे, कृष्णा गवळी व होमगार्ड तेलंग्रे, बोडखे, खरात, लोखंडे, जाधव आदींनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे