pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध

0 3 8 4 4 1

जालना/प्रतिनिधी,दि.7 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील परतूर, अंबड, भोकरदन या नगरपरिषदांच्या निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर खालीलप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा  मित्तिल यांनी जारी केले आहेत.
<span;>ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6.00 वाजण्यापुर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा. ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल.सर्व राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. सदरचे आदेश हे जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सदर निवडणूकीवर प्रभाव पडणारे लगतचे ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत अंमलात राहतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे