बरडशेवाळा आरोग्य केंद्राने कुटुंब शस्त्रक्रियेत केले उदिष्ट पार

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.28
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रोडलगत असलेल्या बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही वर्षांपासुन आलेले निवासी राहुन काम करत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. बी. भिसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. के.सी.बरगे यांच्या अनुभवाचा फायदा आरोग्य केंद्राला झाला असल्याने कार्यक्षेत्रातून समाधान व्यक्त होत असून गेल्या वर्षी कुटुंब शस्त्रक्रियेसह विविध सेवेत जिल्ह्यात नावलौकीक ठरल्याबद्दल सन्मानित झालेल्या बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राने यावर्षीही कुटुंब शस्त्रक्रियेत उद्दिष्ट पार केले आहे.
आरोग्य विभागाच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हदगांव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या सहकार्याने बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील बरडशेवाळा,पिंपरखेड, कवाना, अंबाळा, गोर्लेगाव या पाच आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात दर मंगळवारी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर आयोजन करीत दिलेले दोनशे कुटुंब शस्त्रक्रिया उदिष्ट जवळ आणले. विस फेब्रुवारी रोजी घेण्यात कॅम्पमध्ये सन 2023-24 साठी देण्यात आलेल्या 201 उद्दिष्टानुसार 209 केसेस पूर्ण करून दिलेले उद्दिष्ट पार केले.
यावेळी लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. संतोष अंगरवार डॉ. बोले , वैद्यकीय अधिकारी डॉ.एस बी.भिसे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ.के.सी.बर्गे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आरेवार डॉ.आशीष बेरळकर,डॉ.विजय कानोडे, औषध निर्माण अधिकारी गजानन देशमुख,आरोग्य सहाय्यक संतोष स्वामी, बि.डी.राठोड, आरोग्य सहायिका वाघमारे , नियमित व कंत्राटी आरोग्य सेविका टेकाळे , काळसरे, पडघणे, आरोग्य कर्मचारी शेख एजाज , गजानन राठोड, कनिष्ठ सहाय्यक सूर्यवंशी , डाटा ऑपरेटर शिवकांत पांढरे, फ्लेबोमिस्ट शेख अस्लम ,आरोग्य परीचर शेख इस्माईल बापुराव थाटे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.