pub-7425537887339079
ब्रेकिंग

आदर्श विद्यालयाचा संघ वादविवाद स्पर्धेत प्रथम..! बदनापूर तालुका आकांक्षित अंतर्गत

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

बदनापूर/प्रतिनिधी, दि.12

(दि. ९/१/२०२५) बदनापूर येथे संपन्न झालेल्या पंचायत समिती बदनापूर अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आकांक्षित तालुका बदनापूर अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आकांक्षित तालुका कार्यक्रम केंद्र सरकार द्वारा चालविला जाणारा एक महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. ज्यांचा उद्देश देशातील अविकसित तालुक्यात विकासच्या प्रक्रिया वेगवान करणे आणि तेथील नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा आहे. या अंतर्गत बदनापूर तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सायगाव डोंगरगाव येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत किरण बाबू जमधडे व संकेत सखाराम कोल्हे वर्ग १० वी. च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी सहशिक्षक श्री. राजेभाऊ मगर यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय क्षीरसागर संस्थेचे अध्यक्ष नाथाभाऊ घनघाव तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी केंद्रप्रमुख ए.एस.खिल्लारे, मुख्याध्यापक पंढरीनाथ उनवणे,साधन व्यक्ती बालाजी मदन, कल्पना पाटील, मिरा जगदाळे व शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे